पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीस लुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:51 IST2017-08-18T01:51:49+5:302017-08-18T01:51:49+5:30

अकोला :बोरगाव येथील युवती श्रेया ही गोरक्षण रोडवर असलेल्या मामाच्या घरी आल्यानंतर परत जाण्यासाठी एका किराणा दुकानाजवळ उभी असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी तिला चाकूचा धाक दाखवित गळय़ातील सोनसाखळी व कानातील टॉप्स पळविल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

Police Officer's daughter robbed! | पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीस लुटले!

पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीस लुटले!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :बोरगाव येथील युवती श्रेया ही गोरक्षण रोडवर असलेल्या मामाच्या घरी आल्यानंतर परत जाण्यासाठी एका किराणा दुकानाजवळ उभी असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी तिला चाकूचा धाक दाखवित गळय़ातील सोनसाखळी व कानातील टॉप्स पळविल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
श्रेया ही मामाच्या घरून स्वत:च्या घरी परत जाण्यासाठी गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गोरक्षण रोडवर असलेल्या यादव किराणा समोरून जात होती. यावेळी डिस्कव्हर या दुचाकीवर अचानक तिघेजण आले आणि तिच्याजवळ थांबले. त्यानंतर दुचाकीवरील एकाने तोंड दाबून तिला धरून ठेवले व दुसर्‍याने तिच्या गळ्यातील १३ ग्रॅमची सोनसाखळी व कानातील ३ ग्रॅमचे टॉप्स काढले. या अवस्थेत श्रेयाने प्रतिकार करीत एकाला लाथ मारली. मात्र, झटापटीनंतर तिघेही दुचाकीवरून पळून गेले. श्रेयाचे वडील जुने शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आहेत. या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

Web Title: Police Officer's daughter robbed!