मानव समाज संघटनेतर्फे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:55+5:302021-01-13T04:46:55+5:30
अकोट : येथील मानव समाज संघटनेतर्फे अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ...

मानव समाज संघटनेतर्फे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
अकोट : येथील मानव समाज संघटनेतर्फे अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना संक्रमण काळात पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मानव समाज संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सुरेश सेजपाल होते. पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनुराधा पाटेखेडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाचपोर, संघटनेचे माजी अध्यक्ष भास्करराव पुराळे, ॲड. रतन पळसपगार, ॲड. महेश देव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव विजय जितकर यांनी तर संचालन ॲड. रतन पळसपगार यांनी केले. प्रसंगी पोलीस निरीक्षक महल्ले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी, होमगार्ड्स यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे कैलास जवंजाळ, दीपक सोनोने, लकी इंगळे, अर्जुन चांदूरकर यांची उपस्थिती होती.