पोलीस अधिकार्याची दारुविक्रेत्याने पकडली कॉलर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:05 IST2017-08-28T01:05:49+5:302017-08-28T01:05:54+5:30
बाळापूर : नजीकच्या वाडेगाव पोलीस चौकीच्या सहायक पोलीस निरीक्षकास एका दारू विक्रेत्याने पोलीस चौकीत जाऊन कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी देत लोटपोट केल्याची खळबळजनक घटना २७ ऑगस्ट रोजी घडली.

पोलीस अधिकार्याची दारुविक्रेत्याने पकडली कॉलर!
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : नजीकच्या वाडेगाव पोलीस चौकीच्या सहायक पोलीस निरीक्षकास एका दारू विक्रेत्याने पोलीस चौकीत जाऊन कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी देत लोटपोट केल्याची खळबळजनक घटना २७ ऑगस्ट रोजी घडली.
तसेच त्यांच्या सहकार्यालासुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून बाळापूर पोलिसांमार्फत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
वाडेगावातील पोलीस चौकीतील सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार खंडारे यांना रविवारी अवैध दारू विक्रेता श्रीकृष्ण रामकृष्ण वानखडे याने पोलीस चौकीत जाऊन कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी देऊन लोटालोट केली. यावेळी त्यांचे सहकारी संजय वाघ यांनासुद्धा मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार खंडारे यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भा.दं.वि.च्या ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सदर आरोपी हा गायगाव ग्रामपंचायतचा माजी सरपंच आहे. त्याला १५ दिवसांपूर्वी पारस फाटा येथे चार चाकी गाडीतून दारू वाहतूक करताना पोलिसांनी पकडले होते. त्याचे चारचाकी वाहन अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. अलीकडे गुंड व अनेक दादांची पोलिसांवर हात टाकण्याची हिंमत वाढल्याचे या प्रकरणावरून अधोरेखित होत आहे.