अटक करण्यासाठी आलेल्या ‘एसीबी’ कर्मचाऱ्यावर पिंजरच्या ठाणेदाराने झाडली गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 19:19 IST2019-06-12T19:02:10+5:302019-06-12T19:19:38+5:30
पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कर्मचाºयावर गोळी झाडल्याची घटना बुधवारी घडली.

अटक करण्यासाठी आलेल्या ‘एसीबी’ कर्मचाऱ्यावर पिंजरच्या ठाणेदाराने झाडली गोळी
अकोला : लाच घेताना जाळ्यात अडकल्यानंतर पिंजर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कर्मचाºयावर गोळी झाडल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत एसीबीचे कर्मचारी सचिन धात्रक हे जखमी झाले असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पिंजर पोलीस ठाण्याचे नंदकिशोर नागलकर यांंच्याविरुद्ध अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्यानंतरही ते ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ठाणेदार नागलकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होण्याचे चिन्ह दिसताच या विभागाच्या कर्मचाºयावर स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. यामध्ये सचिन धात्रक हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी पिंजर येथे रवाना झालेले आहेत.