पोलिसांच्या सुट्यांवर लवकरच गदा!

By Admin | Updated: September 22, 2014 01:31 IST2014-09-22T01:18:03+5:302014-09-22T01:31:33+5:30

पोलिस अधिकारी-कर्मचा-यांच्या साप्ताहिक रजा आणि इतर नैमित्तिक रजाही बंद होणार.

Police fights soon! | पोलिसांच्या सुट्यांवर लवकरच गदा!

पोलिसांच्या सुट्यांवर लवकरच गदा!

अकोला : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता लवकरच पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांच्या साप्ताहिक रजा आणि इतर नैमित्तिक रजाही बंद होणार आहेत. २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीतील सुट्या बंद होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव पार पडला. उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख कामगिरी बजावली. वाढत्या बंदोबस्तामुळे पोलिसांना दैनंदिन कामकाजासह तपासावर परिणाम होत आहे. निवडणुकीच्या काळातच विजयादशमी साजरी होणार आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढणार आहे. अशातच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. नवरात्रोउत्सवानंतर खर्‍या अर्थाने निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. निवडणूक आणि त्यानंतर मतमोजणीच्या काळात अनुचित प्रकार घडू, नये यासाठी पोलिसांना २४ तास सतर्क राहावे लागणार आहे.

Web Title: Police fights soon!