सामूहिक बलात्कारातील आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 02:37 IST2017-07-26T02:37:26+5:302017-07-26T02:37:26+5:30

Police detained for gang rape accused | सामूहिक बलात्कारातील आरोपींना पोलीस कोठडी

सामूहिक बलात्कारातील आरोपींना पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: डाबकी रोडवरील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार करणाºया पवन रामटेके आणि विजय सावंग यांना पोलिसांनी मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी तसेच जडी-बुटीचा व्यवसाय करणारे एक कुटुंब डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहिवासी आहे. त्यांची एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवार २४ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास शौचासाठी जात होती. यावेळी रस्त्यात पवन रामटेके आणि विजय सावंग हे दोघे उभे होते. या दोघांनी मुलीला एका मकानात नेऊन दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या दोन नराधमांच्या अघोरी अत्याचारानंतर मुलगी घरी परतली; मात्र आई-वडील मोलमजुरीसाठी कामावर असल्याने ती घरी एकटीच रडत बसली. आई-वडील सायंकाळी घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर आई-वडील व मुलगी डाबकी रोड पोलीस ठाण्यात दाखल होऊन त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हे दाखल करून यामधील आरोपी पवन रामटेके आणि विजय सावंग यांना अटक केली. दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मारहाणीतील आरोपीस अटक
उमरी परिसरातील रहिवासी इसमास मारहाण करणाºया दोघांना सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अटक केली.
मोठी उमरी येथील रहिवासी शंकर जुगल श्रीवास यांना अमोल ऊर्फ भुरिया वामन वाघमारे आणि अमोल दिलीप कडोदे या दोघांना शेतातील फळ खाण्यास मज्जाव केल्यानंतर त्यांनी श्रीवास यांना मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केली. तर या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार आहे.

Web Title: Police detained for gang rape accused