शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नगरसेविकेच्या विरोधात पोलीस तक्रार

By admin | Updated: June 12, 2015 17:41 IST

निवडणूक आयोगाचे निर्देश; मनपाचा निर्णय.

अकोला : प्रभाग क्र. १३ मधील काँग्रेसच्या नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांनी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शपथपत्रात सादर केलेली माहिती चुकीची असल्याने त्यांच्याविरुद्ध प्रशासनाने फौजदारी स्वरूपाची तक्रार सीटी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवली. गुरुवारी आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या आदेशावरून प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांनी तक्रार दाखल केली. राज्य निवडणूक आयोगाने तंबी दिल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला. प्रभाग क्र. १३ मधील काँग्रेसच्या नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी युसूफ सुकीवाले यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यासंदर्भात नगरसेविकेविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने एकदा नव्हे, तर तब्बल पाच वेळा दिले. पाचव्यांदा पाठविलेल्या पत्रात २५ मेपर्यंंत कारवाईचा अहवाल निवडणूक विभागाला सादर करण्याचे निर्देश असताना, मनपाने ३ जूनपर्यंंत अहवालच पाठवला नाही. यादरम्यान, निवडणूक आयोगाने आयुक्त शेटे यांना पुन्हा पत्र पाठवले. यामध्ये १६ जून रोजी निवडणूक आयोगाकडे जातीने उपस्थित राहून कारवाईचा अहवाल सादर करण्याची तंबी दिली. या पत्रानंतर मात्र आयुक्तांनी तडकाफडकी निर्णय घेत, नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेश उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांना दिल्यानंतर सीटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.