Poisoning from spraying: Health check of only 468 farmers-farm laborers! | फवारणीतून विषबाधा : केवळ ४६८ शेतकरी-शेतमजुरांची आरोग्य तपासणी!

फवारणीतून विषबाधा : केवळ ४६८ शेतकरी-शेतमजुरांची आरोग्य तपासणी!

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या विशेष आरोग्य तपासणीमध्ये १३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील कीटकनाशक फवारणी करणाऱ्या केवळ ४६८ शेतकरी-शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यानुषंगाने कीटकनाशक फवारणी करणाºया जिल्ह्यातील सर्व शेतकरी-शेतमजुरांची आरोग्य तपासणी केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात पिकांवरील कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी-शेतमजुरांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे; परंतु जिल्ह्यात गत दोन महिन्यांच्या कालावधीत कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने, १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १३८ शेतकरी-शेतमजुरांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. कीटनाशकांच्या फवारणीतून विषबाधेच्या घटना वाढल्याने, कृषी विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात कीटकनाशकाची फवारणी करणाºया शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्याची विशेष मोहीम गत २६ आॅगस्टपासून सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २५ आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कीटकनाशक फवारणी करणाºया शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य तपासणी सुरू होऊन १८ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र १३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करणाºया केवळ ४६८ शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी होणे अद्याप प्रलंबित असल्याने, जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करणाºया सर्व शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी केव्हा पूर्ण करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


अशी केली जाते आरोग्य तपासणी!
कीटकनाशकाची फवारणी करणाºया शेतकरी व शेतमजुरांच्या आरोग्य तपासणीत शेतकरी व शेतमजुरांना आजार आहे का, तसेच फवारणी करण्यापूर्वी व फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात वैद्यकीय अधिकाºयांकडून शेतकरी-शेतमजुरांना सल्ला देण्यात येतो.


जिल्ह्यात कीटकनाशकाची फवारणी करणाºया शेतकरी व शेतमजुरांच्या आरोग्य तपासणीची मोहीम सुरू आहे. त्यामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणीसह फवारणी करण्यापूर्वी व फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, याबाबत शेतकरी व शेतमजुरांना सल्ला देण्यात येत आहे.
- डॉ. सुरेश आसोले
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.


आरोग्य तपासणी केलेले असे आहेत शेतकरी-शेतमजूर!
तालुका                      शेतकरी
बाळापूर                    १५०
बार्शीटाकळी              ५८
तेल्हारा                     २५
मूर्तिजापूर                ८५
पातूर                        २३
अकोला                    ६१
अकोट                      ६६
...................................
एकूण                     ४६८

 

Web Title: Poisoning from spraying: Health check of only 468 farmers-farm laborers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.