शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

जंतनाशक गोळय़ातून २६ विद्यार्थ्यांना विषबाधा

By admin | Updated: February 11, 2015 01:26 IST

चिखली तालुक्यातील घटना; ७ विद्यार्थी अत्यवस्थ.

चिखली (जि.बुलडाणा) : जंतनाशक गोळय़ांच्या सेवनातून चिखली तालुक्यातील २६ विद्यार्थ्यांना मंगळवारी विषबाधा झाली. सोनेवाडी येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत घडलेल्या या घटनेमध्ये सात विद्यार्थी अत्यवस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मंगळवारी जिलतील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळय़ांचे वितरण करण्यात आले. सोनेवाडी जिल्हा परिषद शाळेत दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. दुपारी ३ च्या सुमारास पंधरा वर्षांच्या आतील मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. या गोळय़ांचे सेवन केल्यानंतर, काही वेळातच काही विद्यार्थ्यांना पोट दुखणे, मळमळ व उलट्याचा त्रास सुरू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिक्षक, तथा पालकांनी धावपळ सुरू केली. विद्यार्थ्यांना तत्काळ चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर १९ विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. परंतु अश्‍वीनी गजानन पवार (१३), हर्षल प्रल्हाद पवार (११), प्रतीक दगडू पांचाळ (८), सितल मुरलीधर जाधव (१३), शिवाजी सुभाष सोनोने (१२) सुनिता राजू राखोंडे (१३) व सिमा रमेश कर्‍हाडे या सात विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. *आरोग्य कर्मचार्‍यांची कार्यक्रमाला दांडीसातगाव भुसारी येथील प्राथमिक उपकेंद्राअंतर्गत सोनेवाडी येथील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे मंगळवारी वाटप करण्यात आले. यावेळी उपकेंद्रातील आरोग्य विभागाशी संबंधित एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. विद्यार्थ्यांंना जंतनाशकाच्या गोळ्या देण्यासारख्या महत्वाच्या कार्यक्रमालाही या विभागाच्या कर्मचार्‍यांनी दांडी मारली.