नवथळ गावातील प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:06+5:302021-02-05T06:14:06+5:30
माजी आमदार डॉ. दशरथ भांडे यांच्या स्थानिक निधीतून काही वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला होता. सदर प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम ...

नवथळ गावातील प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था
माजी आमदार डॉ. दशरथ भांडे यांच्या स्थानिक निधीतून काही वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला होता. सदर प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे प्रवासी निवारा दोन वर्षांतच जमीनदोस्त झाला. सदर प्रवासी निवारा शुक्रवारी रात्री अचानक जमीनदोस्त झाल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली असून, प्रवाशांना बसण्यासाठी कुठल्याच प्रकारची सोय नाही. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता प्रवासी येथे बाजूला उभे राहून वाहनाची वाट पाहतात. या गावातून दररोज शंभर ते दीडशे प्रवासी अकोला, अकोट शहरांकडे कामानिमित्त जातात; परंतु प्रवासी निवारा नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे आमदार नितीन देशमुख यांनी स्थानिक निधीतून गावासाठी प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
...........................................फोटो