शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

प्लास्टिक बंदी : शासनाचे विभाग अनभिज्ञ, अधिसूचनेनुसार कारवाईसाठी निर्देशच दिले नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:34 PM

अकोला : प्लास्टिक बंदी करण्यासाठी वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार ज्या विभागांना देण्यात आले, त्यातील बऱ्यांच विभाग प्रमुखांना त्याबाबत माहितीच नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांना अधिसूचनेनुसार कारवाई करण्याचे निर्देशही दिले नाही.

ठळक मुद्दे कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका, नगर परिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे, या भ्रमातच शासनाचे इतर विभाग आहेत. शासनाने २३ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतच प्लास्टिक बंदी करण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार असलेले विभाग निर्देशित केले आहेत. प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी गंभीरपणे करणे अत्यावश्यक असतानाही त्याकडे शासनाच्या यंत्रणांनी कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

अकोला : प्लास्टिक बंदी करण्यासाठी वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार ज्या विभागांना देण्यात आले, त्यातील बऱ्यांच विभाग प्रमुखांना त्याबाबत माहितीच नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांना अधिसूचनेनुसार कारवाई करण्याचे निर्देशही दिले नाही. ग्रामसेवक, शिक्षण विभाग, आरोग्य विभागाकडून कारवाईसाठी जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देत कारवाई करण्याचे बजावले, तर जिल्हाधिकारी कार्यालयातून उद्या बुधवारी तसा आदेश दिला जाणार आहे.प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका, नगर परिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे, या भ्रमातच शासनाचे इतर विभाग आहेत. शासनाने २३ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतच प्लास्टिक बंदी करण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार असलेले विभाग निर्देशित केले आहेत. त्यामध्ये अनेक विभागांचा समावेश आहे. प्रामुख्याने महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते; मात्र या विभागाच्या अधिकाºयांना जबाबदारीबद्दल माहितीच नसल्याने मंगळवारी पुढे आले. ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर उद्या बुधवारी संबंधितांना पत्र दिले जातील, पथके गठित केली जातील, असे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, शासनाने प्लास्टिक बंदी करण्यामागची कारणेही स्पष्ट केली आहेत. त्यामध्ये प्लास्टिक कचऱ्यामुळे व मायक्रो प्लास्टिकमुळे सागरी जीव, नदी-नाल्यातील जलचर व जैवविविधतेवर परिणाम होतो. शेती, वने या ठिकाणी प्लास्टिकमुळे उपयुक्त नैसर्गिक घटक व साधनसंपत्तीचा ºहास होतो. त्याशिवाय, मानवी आरोग्यावरही भयंकर परिणाम होतो. त्यासाठी प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी गंभीरपणे करणे अत्यावश्यक असतानाही त्याकडे शासनाच्या यंत्रणांनी कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

 कारवाईची विविध विभागांवर जबाबदारीकायद्यानुसार प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईसाठी विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिका आयुक्तांसह सर्व यंत्रणा, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, उप-जिल्हाधिकारी, उप-विभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य संचालकांसह यंत्रणा, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलीस निरीक्षक, उप-निरीक्षक, मोटर वाहन निरीक्षक, वाहतूक पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा, पर्यटन विकास महामंडळ यंत्रणा, फॉरेस्ट रेंज आॅफिसर, उप-वनसंरक्षक यंत्रणा या विभागांवर कारवाईची धुरा देण्यात आली आहे.प्लास्टिक बंदीच्या अधिसूचनेतील निर्देशानुसार महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांना कारवाईचे अधिकार देण्यात आले. सर्व संबंधितांना लवकरच पत्र देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली जाईल. महसूल विभागही अधिकारानुसार निश्चित कारवाई करणार आहे.

- श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी. पुरवठा विभागातील कर्मचाºयांची पथके गठित करून प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जातील. शासनाच्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांची माहिती पथकाला दिली जाईल. प्रभावीपणे मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला जाईल.

- संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्लास्टिक बंदीचा कायदाच आहे. कायद्याने ठरवून दिलेली जबाबदारी पार पाडणे सर्वांचे कर्तव्य आहे. पोलीस विभागही कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करणारच आहे. त्यासाठी कार्यालयातून आणखी पत्र देणे अपेक्षित नाही. नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडल्यास कारवाईची वेळ येणार नाही.- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक 

 

टॅग्स :AkolaअकोलाPlastic banप्लॅस्टिक बंदी