सिमेंट रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:00+5:302021-07-15T04:15:00+5:30

पांडुरंगाचे दर्शन घरूनच घ्या अकाेला : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्याचे टाळावे, पांडुरंगाचे दर्शन घरूनच करण्याचे आवाहन श्रद्धासागर आकाेटचे अध्यक्ष ...

Pits on cement roads | सिमेंट रस्त्यावर खड्डे

सिमेंट रस्त्यावर खड्डे

पांडुरंगाचे दर्शन घरूनच घ्या

अकाेला : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्याचे टाळावे, पांडुरंगाचे दर्शन घरूनच करण्याचे आवाहन श्रद्धासागर आकाेटचे अध्यक्ष हभप वासुदेवराव महल्ले महाराज यांनी केले आहे़ पंढरपूर येथे कडक संचारबंदी लागू हाेणार असल्याने भाविकांनी व वारकऱ्यांनी घरूनच पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारी यशस्वी झाल्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन महल्ले महाराज यांनी केले आहे़

विराहीत येथील रस्त्याचे बांधकाम करा

अकाेला : विराहीत फाटा ते तुळजा भवानी मातेचे मंदिर या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, गावकऱ्यांना व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना माेठा त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे विराहीत फाटा ते मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे तातडीने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी विराहीत येथील ग्रामस्थांनी केली आहे़ यासाठी आमदारांसह अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे़

वादळाने टीनपत्रे काेसळले

अकाेला : काैलखेड ते तुकाराम चाैक या रिंग राेडवर असलेल्या माेठ्या बांधकामाचे टीनपत्रे बुधवारी पहाटे आलेल्या वादळाने काेसळल्याची घटना घडली़ या मैदानात दिवसभर नागरिक असतात; मात्र सुदैवाने वादळ पहाटेच्या सुमारास आल्याने या मैदानात कुणीही नव्हते़ त्यामुळे काेणतीही हानी झाली नाही़

Web Title: Pits on cement roads