शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

पुलाच्या बांधकामासाठी जलवाहिनी कापली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 4:55 PM

हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली.

हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली. यामुळे हातरुण, मालवाडा, लोणाग्रा आणि हातला गावातील पाणीपुरवठा एका महिन्यापासून बंद पडलेला आहे. अचानक निर्माण झालेल्या पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच चार गावांना पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. दुष्काळी परिस्थिती असतांना पाणीपुरवठा विभागाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.कारंजा रमजानपुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १० गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. कारंजा रमजानपूर येथे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बोअरवेल करण्यात आले होते. या बोअरवेल चे पाणी जलकुंभात साठवून प्रत्येक गावात जलवाहिनीद्वारे पोहचण्याची व्यवस्था आहे. मात्र आज रोजी कारंजा रमजानपुर पाणीपुरवठा योजनेसाठी असलेले सहा बोरवेल आटले असून त्यामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. काही बोरवेलच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनेला होणारा  वीजपुरवठयावर विजेचा लपंडाव होत असल्याने गावागावात पाणी पुरवठा करतांना अडथळा निर्माण होत आहेत. लोनाग्रा, हातरुण, मालवाडा आणि हातला गावात पुलाच्या बांधकामामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुलाचे बांधकाम सुरू असतांना जलवाहिनी कापण्यात आल्याने चार गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला असून या चार गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. मालवाडा गावातील नागरिक बोअरवेलचे खारे पाणी पीत असल्याने पोटाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. कारंजा रमजानपूर योजनेच्या ठिकाणापासून ते शिंगोली, मालवाडा, हातरुण, लोनाग्रा आणि हातला अशी नवीन जलवाहिनी मागील वर्षी टाकण्यात आली. कारंजा रमजानपूर पाणी पुरवठा योजने अंतर्गत अकरा बोअरवेल पैकी सहा बोअरवेल आटल्याने पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. गावागावात बोअवरवेल करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी मालवाडा सरपंच गणेश आढे, लोनाग्रा सरपंच निर्मला सोनोने, सुधाकर बोर्डे, प्रवीण बोर्डे, अक्षय खंडेराव, नीलकंठ कसुरकर, संजय भिलकर, भाजपचे युवा नेते संदीप बोर्डे, गोपाल सोनोने, वैभव दुतोंडे, अमोल चौधरी, गजानन गायकवाड, अंकित खाकरे, शहजाद खान, विशाल ठाकरे, राजेंद्र नसुर्डे, संतोष गव्हाळे, साजिद शाह, शुभम निर्मळ, यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

पाईपलाईन जोडण्यासाठी मुहूर्त सापडेना!

हातरुण आश्रमशाळेसमोर निर्माणाधिन असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी जलवाहिनी कापण्यात आली. त्यामुळे चार गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चार गावातील हजारो नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. रविवारी भाजप कार्यकर्ता मुकेश गव्हाणकर यांनी मालवाडा ग्रामस्थांची भेट घेऊन पाणीटंचाईची समस्या जाणून घेतली. जनतेला पाणी मिळावे म्हणून पाईपलाईन जोडण्यासाठी मुहूर्ताची प्रतीक्षा करू नका. तात्काळ पाईपालन न जोडल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशारा संवाद ग्रुप चे अध्यक्ष मुकेश गव्हाणकर यांनी दिला आहे.

हातरुण आश्रमशाळेसमोर पुलाचे बांधकाम करीत असतांना पाईपलाईन कापण्यात आली आहे. यामुळे चार गावात एका महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर अद्यापही संबधीत विभागाने उपाययोजना केली नाही.पाणी पुरवठा विभागाने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये.   - गणेश आढे, सरपंच, मालवाडा.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक