Physical exploitation of a young woman by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, युवकाविरूद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, युवकाविरूद्ध गुन्हा दाखल

पातूर : युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबध प्रस्थापित करणाऱ्या युवकाविरुद्ध पातूर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. पातूर तालुक्यातील २७ वर्षीय युवतीला माझोड येथील सुरज श्रीकृष्ण खंडारे (२५) याने लग्नाचे आमिष दाखविले. त्याच्या भूलथापांना युवती बळी पडली. सुरजने तिच्यासोबत शारीरिक संबध प्रस्थापित करून तिचे वर्षभर लैंगिक शाेषण केले. युवतीने लग्नाचा तगादा लावला असता, त्याने, लग्न करण्यास नकार दिला. युवतीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी सुरज खंडारे याच्याविरूद्ध भादंवि कलम ३७६, २, एन ४१७ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

Web Title: Physical exploitation of a young woman by showing the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.