शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-अकोट मार्गावर पेट्रोलचा टँकर उलटला; शेकडो लिटर पेट्रोल रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:09 IST

चोहोट्टा बाजार (जि. अकोला) : अकोला ते आकोट मार्गावरील चोहोट्टा बाजारनजीक पळसोद फाटा या ठिकाणी पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर व पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.

ठळक मुद्देगायगाव येथील हिंदूस्थान पेट्रोलियम डेपो येथून अकोटच्या दिशेने जात असलेल्या एम.एच. २० ए.ए. ९९६१ क्रमांकाच्या टँकरचा पळसोद फाट्याजवळ स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसली, तरी शेकडो लिटर पेट्रोल वाहून गेले. काही नागरिकांनी टँकरमधील पेट्रोल चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जमावास पांगविले.

चोहोट्टा बाजार (जि. अकोला) : अकोला ते आकोट मार्गावरील चोहोट्टा बाजारनजीक पळसोद फाटा या ठिकाणी पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर व पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसली, तरी शेकडो लिटर पेट्रोल वाहून गेले. दरम्यान, टँकरमधील पेट्रोल घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती.गायगाव येथील हिंदूस्थान पेट्रोलियम डेपो येथून अकोटच्या दिशेने जात असलेल्या एम.एच. २० ए.ए. ९९६१ क्रमांकाच्या टँकरचा पळसोद फाट्याजवळ स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी देवरी फाटा येथून पाणी भरून येत असलेल्या एम. एच. ३० व्ही. ६२७० क्रमांकाचा टँकर येत होता. अनियंत्रीत झालेल्या पेट्रोल टँकरने पाण्याच्या टँकरला धडक दिली. त्यामुळे पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. उलटलेल्या टँकरमधून शेकडो लिटर पेट्रोल रस्त्यावर वाहून गेले. ही वार्ता पसरताच नागरिकांनी पळसोद फाट्यावर मोठी गर्दी केली. यावेळी काही नागरिकांनी टँकरमधील पेट्रोल चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जमावास पांगविले. यावेळी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. पेट्रोलच्या टँकरचा स्फोट होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणakotअकोटPetrolपेट्रोलAccidentअपघात