कीटकनाशके अनुदानावर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:09 IST2017-08-28T01:09:16+5:302017-08-28T01:09:36+5:30
अकोला : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर रोग, कि डींनी आक्रमण केले असून, अनेक भागात या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासाठी कृषी विभागामार्फत शेतकर्यांना अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत.

कीटकनाशके अनुदानावर उपलब्ध
लोकमत न्यीज नेटवर्क
अकोला : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर रोग, कि डींनी आक्रमण केले असून, अनेक भागात या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासाठी कृषी विभागामार्फत शेतकर्यांना अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत.
खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी पिकाकरिता क्रॉपसॅप अंतर्गत पीक प्रात्यक्षिक आधारित प्रकल्पांतर्गत कीड व रोग नियंत्रणासाठी औषधे देण्यासाठी उपलब्ध झाले असून, तालुक्यातील शेतकर्यांनी औषधे घेऊन जायचे आहे. उपलब्ध कीटकनाशकांसाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अकोला तालुका कृषी अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषी मित्र, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करू न शेतकर्यांना मार्गदर्शन करीत आहेत.