जिद्द, मेहनतीच्या बळावर गाठले आयआयटीचे शिखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST2021-02-06T04:32:07+5:302021-02-06T04:32:07+5:30
मेहनत पडली कोरोनावर भारी गतवर्षी कोरोना संकट काळात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेगावात अडकल्यामुळे आतापर्यंत केलेली मेहनत वाया जाईल, अशी ...

जिद्द, मेहनतीच्या बळावर गाठले आयआयटीचे शिखर
मेहनत पडली कोरोनावर भारी
गतवर्षी कोरोना संकट काळात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेगावात अडकल्यामुळे आतापर्यंत केलेली मेहनत वाया जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनाच्या धास्तीमुळे अनेकांनी घरातून बाहेर न पडण्यालाच प्राधान्य दिले. महेशने मात्र कोरोनाची भीती बाजूला सारत अकोला गाठले व जेईई ॲडव्हान्सची परीक्षा देऊन आयआयटीचे शिखर सर केले.
गुरुचे 'समर्थ' पाठबळ
महेशमधील गुणवत्ता हेरत प्रा. नितीन बाठे यांनी स्वत:च्या खिशातील एक हजार रुपये महेशच्या वडिलांना देत स्वत:च्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सांगितले. एवढेच नव्हे, तर महेशच्या राहण्याचीही व्यवस्था करून दिली. लॉकडाऊन काळात महेश शेगावमध्ये अडकून पडला होता. त्यावेळी त्याला अकोला येथे येण्यासाठी मदत केली. केवळ शिक्षणच नव्हे, तर प्रा. बाठे यांनी स्वत:च्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे महेशचे सर्व केल्याचे त्याचे कुटुंबीय मोठ्या अभिमानाने सांगतात.