शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन; अंतिम सुनावणी १३ फेब्रुवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:15 PM

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या पेन्शन याचिकेवर १३ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी होणार असून, या सुनावणीकडे वीज कंपन्यांमधील कर्मचाºयांच्या नजरा लागल्या आहेत.

अकोला : तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (मराविमं) तथा आताच्या तिन्ही सरकारी वीज कंपन्यांमधील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाºयांना सेवानिवृत्ती वेतन मिळावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या पेन्शन याचिकेवर १३ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी होणार असून, या सुनावणीकडे वीज कंपन्यांमधील कर्मचाºयांच्या नजरा लागल्या आहेत.विद्युत मंडळाने ३१ डिसेंबर रोजी ठराव मंजूर करून १ जानेवारी १९७४ किंवा त्यानंतर निवृत्त होणाºया वीज कर्मचाºयांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र शासनानेही या योजनेची तपासणी केल्यानंतर २७ जानेवारी २००१ रोजी विधानसभेत निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर मात्र या योजनेचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे म. रा. विद्युत मंडळ, निवृत्त कर्मचारी संघ, नागपूरचे संस्थापक अध्यक्ष बी. के. करंदीकर व इतरांनी निवृतीवेतन योजनेसाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपरोक्त याचिकेवर १९ नोव्हेंबर रोजी निर्णय देताना विद्युत मंडळ व संबंधित उत्तराधिकारी कंपन्यांनी आपसात चर्चा करून योजनेच्या अंमलबजावणीबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेशित केल्याने सर्व कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु तीन महिन्यांत कोणत्याही हालचाली न झाल्यामुळे मूळ अर्जदारांनी खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली. त्यानंतर ६ फेब्रुवारी २००८ रोजी सूत्रधारी कंपनीच्या संचालकांची बैठक होऊन मंडळाची आर्थिक अडचण व महाराष्ट्र शासन योजनेचा बोजा घ्यायला तयार नसल्याने योजना लागू करण्यास असमर्थ असल्याचे कळविण्यात आले. अवमानना याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्यांनी पेन्शनविषयक सर्वसमावेशक मुद्दे सामील करून नव्याने याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने याचिकाकर्त्यांनी याचिका क्र. ६९५०/२०१८ दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय एस. एच. शुक्रे व एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर १० जुलै रोजी सुनावणी होऊन ही याचिका अंतिम सुनावणीसाठी मंजूर करण्यात आली. आता गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी याचिकेवर सुनावणी होणार असल्याने वीज कंपन्यांमधील सेवानिवृत्त व सेवारत कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाHigh Courtउच्च न्यायालय