अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 10:54 IST2021-01-09T10:50:00+5:302021-01-09T10:54:07+5:30

Accident News सय्यद रौशन सय्यद रमजान असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

Pedestrian youth killed in collision with unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण ठार

ठळक मुद्देघटना ८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तो घटनास्थळीच गतप्राण झाला.

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील स्मशानभूमीजवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय तरुण घटनास्थळीच ठार झाल्याची घटना ८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. सय्यद रौशन सय्यद रमजान असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

नागपूर येथील रहिवासी, पण काही दिवसांपूर्वी नवीन घरकुल परिसरात राहण्यास आलेला सय्यद रौशन सय्यद रमजान हा काही कामानिमित्त कारंजा टी-पॉईंवर आला होता. रात्री ८ वाजताच्या सुमारास नवीन घरकुल येथे परत जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील स्मशानभूमीजवळ अकोल्याच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तो घटनास्थळीच गतप्राण झाला. घटनेची माहिती कळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता तो मृतावस्थेत आढळला. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: Pedestrian youth killed in collision with unknown vehicle