जलवाहिनीसाठी रस्ता खाेदला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:21 IST2021-02-05T06:21:08+5:302021-02-05T06:21:08+5:30
उड्डाणपुलाखाली सांडपाण्याची समस्या अकाेला : शहरात खदान पाेलिस ठाणे ते रेल्वे स्टेशन राेडतच्या निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात ...

जलवाहिनीसाठी रस्ता खाेदला!
उड्डाणपुलाखाली सांडपाण्याची समस्या
अकाेला : शहरात खदान पाेलिस ठाणे ते रेल्वे स्टेशन राेडतच्या निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पावसाचे पाणी व रस्त्यालगतच्या दाेन्ही बाजूंच्या प्रतिष्ठाणांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दाेन्ही बाजूला नाल्यांचे बांधकाम केले जात असले तरी नाल्यांचे बांधकाम नियमानुसार हाेत नसल्याचा आक्षेप व्यावसायिकांनी घेतला आहे.
जलवाहिनीची दुरुस्ती नाहीच!
अकाेला : सिव्हील लाइन चाैक ते जवाहरनगर चाैक पर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रस्त्याचे खाेदकाम करण्यात आले. जलवाहिनीची जाेडणी करताना अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागून पाण्याचा अपव्यय झाला हाेता. संबंधित कंत्राटदाराने अद्यापही जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात केली नसल्याचे समाेर आले आहे.
सफाइ कर्मचाऱ्यांचा माेर्चा दडपला
अकाेला : मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढल्या जात नसल्यामुळे अखिल भारतीय सफाई मजदूर काॅंग्रेसच्यावतीने आयुक्त संजय कापडणीस यांच्या निवासस्थानावर २५ जानेवारी राेजी माेर्चाचे आयाेजन करण्यात आले हाेते. परंतु पाेलिस प्रशासनाने हा माेर्चा दडपल्याचा आराेप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ
अकाेला : मनपाच्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी नगरसचिव अनिल बिडवे, कर अधीक्षक विजय पारतवार, भांडार विभाग प्रमुख शाम राऊत, गणेश बिल्लेवार, प्रमोद गायकवाड, संजय राजनकर, अविनाश वासनिक, संगीता ठाकूर, नीलम खत्री, राजेश सोनाग्रे, कैलास ठाकूर, विश्वनाथ सुतवणे आदींची उपस्थिती होती.
मुख्य नाला घाणीने तुडुंब
अकाेला : शहरातील दुर्गा चाैकातील मुख्य नाला घाणीने तुडुंब साचला आहे. नाल्यात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या बाॅटलचा खच साचल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी तुंबल्यामुळे स्थानिक रहिवाशांना घाण दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
डंम्पिंग ग्राऊंडमुळे रहिवासी त्रस्त
अकाेला : नायगाव येथे मनपाच्या डंम्पिंग ग्राऊंडवर शहरातील कचऱ्याची साठवणूक केली जाते. कचऱ्याला आग लागून धूर निघत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या जीवीताला धाेका निर्माण झाला आहे. धुरामुळे श्वास घेण्यास अडचण हाेत असून हवा प्रदूषित झाली आहे.
हरिहरपेठमध्ये साचले पाणी
अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आऊटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी जलप्रदाय विभाग पुढाकार घेइल का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
मैदानाला अतिक्रमणांचा विळखा
अकाेला : जुने शहरातील डाबकी राेडवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानालगत अतिक्रमण करणाऱ्यांनी झाेपड्या उभारल्याचे समाेर आले आहे. मैदानालत नागरिकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शाैचालय असून त्या ठिकाणीसुध्दा लाकूड व्यावसायिकांनी अतिक्रमण थाटले आहे. याप्रकरणी मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे.