‘सवरेपचार’मध्ये रुग्णांचा भार नातेवाइकांच्या खांद्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:13 IST2017-08-26T01:13:36+5:302017-08-26T01:13:45+5:30
पश्चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या बुलडाणा, वाशिम जिल्हय़ातूनही दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात सुविधांच्या अभावामुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाइकांचेही हाल होतात. रुग्णालयातील कर्मचार्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने येथे उपचारासाठी येणार्या रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईकही हतबल होत असल्याचे चित्र दररोजच पाहावयास मिळते.

‘सवरेपचार’मध्ये रुग्णांचा भार नातेवाइकांच्या खांद्यावर!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पश्चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या बुलडाणा, वाशिम जिल्हय़ातूनही दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात सुविधांच्या अभावामुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाइकांचेही हाल होतात. रुग्णालयातील कर्मचार्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने येथे उपचारासाठी येणार्या रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईकही हतबल होत असल्याचे चित्र दररोजच पाहावयास मिळते.
रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांना अपघात कक्षातून किंवा वॉर्डमधून एक्सरे, सीटी स्कॅन करण्यासाठी हलवायचे असल्यास वॉर्डबॉय किंवा इतर कर्मचार्यांनी मदत करणे अपेक्षित आहे; परंतु येथे रुग्णांना हलविण्याचे काम नातेवाइकांनाच करावे लागते. वॉर्डांमध्ये कधी-कधी स्ट्रेचरही उपलब्ध नसते. त्यामुळे नातेवाइकांनाच रुग्णांना आधार देऊन किंवा उचलून न्यावे लागते. एवढेच नव्हे, तर काही कर्मचारी सेवारत असलेल्या डॉक्टरांनाही सहकार्य करीत नसल्याचे काही डॉक्टरांनी खासगीत बोलताना सांगितले. रुग्णालय प्रशासन मात्र याबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे.
रात्रपाळीला कर्मचार्यांची दांडी
आंतरवासिता डॉक्टर व परिचारिका रुग्णांना बरे करण्यासाठी सतत परिश्रम घेतात; मात्र काही कर्मचार्यांचा हलगर्जीपणा व कामचुकारपणामुळे परिचारिकांवर ताण वाढविला आहे. रात्रपाळीत अटेन्डंट, कक्षसेवक, स्वीपर, सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे; मात्र महिनाभरातून क्वचितच हे कर्मचारी उपस्थित राहत असल्याच्या तक्रारी आहेत. या कर्मचार्यांच्या अनुपस्थितीत सर्वच कामाची धुरा परिचारिकांना सांभाळावी लागत आहे.
रिक्त पदांमुळे रुग्णसेवा बाधित
सवरेपचार रुग्णालयात डॉक्टरपासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांपर्यंतची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचार्यांवर रुग्णसेवेचा भार येऊन पडला आहे. रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे; परंतु ही पदे भरली जात नसल्यामुळे रुग्णसेवेचा खोळंबा होत आहे.
स्ट्रेचरवर बसतात हादरे
अपघात कक्षापासून वॉर्डांकडे जाणारा रस्ता गुळगुळीत नसल्याने स्ट्रेचरला हादरे बसतात, तसेच या मार्गावर सावलीची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे भरउन्हात रुग्णांना स्ट्रेचरवर टाकून नेले जाते, त्यामुळे रुग्णांना त्रास होतो.