रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला : १४ पॉझिटिव्ह; १४ डिस्चार्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 10:12 IST2020-11-06T10:11:57+5:302020-11-06T10:12:11+5:30
Akola coronavirus News गत महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे.

रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला : १४ पॉझिटिव्ह; १४ डिस्चार्ज!
अकोला: जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला असून, गुरुवारी १४ जणांना डिस्चार्ज, तर १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीचे ८, तर रॅपिड ॲन्टिजन चाचणीच्या ६ पॉझिटिव्ह अहवालांचा समावेश आहे. गत महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. गुरुवारी आरटीपीसीआरच्या प्राप्त अहवालामध्ये ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. यामध्ये पाच महिला व तीन पुरुष आहेत. यातील दोन रुग्ण मूर्तिजापूर येथील आहेत, तर उर्वरित अदलापूर (ता. अकोट), वृंदावननगर, जामठी (ता. मूर्तिजापूर), माधवनगर, रामदासपेठ व तेल्हारा येथील आहेत. तर उर्वरित ६ रुग्ण हे रॅपिड ॲन्टिजन चाचणीतील आहेत. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार जणांना, तर आयकॉन रुग्णालयातून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून चार जण, स्कायलार्क हॉटेल येथून तीन, अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आले. सद्यस्थितीत २०६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८,५०२ वर पोहोचली असून ८,०१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसाला ५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह
आरटीपीसीआर आणि रॅपिड ॲन्टिजन चाचणीचे दररोज अहवाल प्राप्त होतात. या अहवालांतील केवळ ५ टक्के अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. हेच प्रमाणत ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात २० टक्क्यांवर होते.