बसचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 14:37 IST2020-01-05T14:37:52+5:302020-01-05T14:37:58+5:30
शिर्ला ( अकोला ) : भरधाव बस आणि विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकची अमोरासमोर धडक होणार तोच बसचालकाने प्रसंगावधान ...

बसचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण
शिर्ला (अकोला) : भरधाव बस आणि विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकची अमोरासमोर धडक होणार तोच बसचालकाने प्रसंगावधान दाखवून बस रस्त्याच्या कडेला घेतल्याने बसमधील आठ ते दहा प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना अकोला ते पातूर महामार्गावर रविवारी सकाळी घडली.
वाशिम आगाराची एम.एच. ४० एन. ९३११ क्रमांकाची लालपरी बस अकोल्याहून वाशिमकडे जात होती. या बसमध्ये आठ ते दहा प्रवासी प्रवास करीत होते. बस चिखलगावनजीक आली असता अपघात प्रवणस्थळाजवळ विरुद्ध दिशेन भरधाव वेगाने येत असलेला एम.एच. ३७ जे. २५९९ क्रमांकाचा ट्रक बसवर धडकणार होता. बसचालक अशोक लांडकर यांनी प्रसंगावधान दाखवित करकचून ब्रेक दाबले व बस रस्त्याच्या कडेला घेतली. यामुळे ट्रक आणि बसची धडक टळली मात्र ट्रक पुढे जाऊन एका झाडाला धडकला. बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. या प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासाकरीता रवाना करण्यात आल्याचे वाहक महेंद्र पागडे यांनी सांगितले. पातूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.