निर्माणाधीन पुलाखालील वाहनतळ धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:16 IST2021-02-08T04:16:49+5:302021-02-08T04:16:49+5:30

अकाेला : जेल चाैक ते न्यायालयापर्यंत निर्माणाधीन असलेल्या पुलाखाली वाहनतळ तसेच खाद्यपेयाची दुकाने लागली आहेत. या अवैध वाहनतळ आणि ...

The parking lot under the bridge under construction is scorching | निर्माणाधीन पुलाखालील वाहनतळ धाेकादायक

निर्माणाधीन पुलाखालील वाहनतळ धाेकादायक

अकाेला : जेल चाैक ते न्यायालयापर्यंत निर्माणाधीन असलेल्या पुलाखाली वाहनतळ तसेच खाद्यपेयाची दुकाने लागली आहेत. या अवैध वाहनतळ आणि दुकानांमूळे अनेकांचा जीव धाेक्यात असून याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

वाशिम बायपास चाैकात वाहतूक जॅम

अकाेला : वाशिम बायपास चाैकात सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने या ठिकाणी वाहतूक जाम हाेत असल्याचे चित्र आहे. दिवसभरात दर तासाला वाहतूक जाम हाेत असल्याने माेठा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. या राेडची एक बाजू तयार करण्याची मागणी हाेत आहे.

शहरात अवैध बांधकामाचा सपाटा

अकाेला : शहरात सध्या काही माेठ्या उद्याेजक व बिल्डर्सकडून अवैध बांधकामाचा सपाटा सुरु करण्यात आला आहे. यावर मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: The parking lot under the bridge under construction is scorching