देऊळगाव येथील परमहंस पुंडलिक महाराज विद्यालयासमोर ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 20:23 IST2018-01-22T20:18:58+5:302018-01-22T20:23:52+5:30
खेट्री : पातूर-बाळापूर महामार्गावरील देऊळगाव येथील परमहंस पुंडलिक महाराज विद्यालयाच्या मुख्य द्वारासमोर ट्रक उलटल्याची घटना २१ जानेवारी रोजी दुपारी घडली. तथापि यात कुणीही जखमी झाले नाही.

देऊळगाव येथील परमहंस पुंडलिक महाराज विद्यालयासमोर ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला
लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री : पातूर-बाळापूर महामार्गावरील देऊळगाव येथील परमहंस पुंडलिक महाराज विद्यालयाच्या मुख्य द्वारासमोर ट्रक उलटल्याची घटना २१ जानेवारी रोजी दुपारी घडली. तथापि यात कुणीही जखमी झाले नाही.
हैदराबादहून किराणा सामान घेऊन इंदूरकडे जाणारा एम पी 0९ एच.एफ.३९0२ क्रमांकाच्या ट्रकचालकाचे गतिरोधकामुळे स्टेअरिंग व्हीलवरील नियंत्रण सुटल्याने २१ जानेवारीच्या दुपारी सदर ट्रक परमहंस महाराज विद्यालयाचे समोरच उलटला. दुपारी विद्यार्थ्यांना जेवणासाठी एक ते दीड तासाची सुट्टी असते. त्या सुट्टीच्या वेळेस विद्यार्थी शाळेच्या आवारात आणि मुख्य द्वारासमोर रस्त्यावरच खेळत असतात; परंतु घटनेच्या दिवशी रविवार असल्याने विद्यालयाला सुट्टी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.