अकोला : चालू वर्षात रमाई आवास योजनेतील घरकुलांचे ग्रामपंचायतनिहाय वाटप करताना पंचायत समिती स्तरावर लाखो रुपयांची उलाढाल झाली. त्यासाठी अधिकाऱ्यांनी सरपंच, सचिवामार्फत लाभार्थींकडून रक्कम वसुलीचे ‘टार्गेट’च दिले. ...
अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेची जलवाहिनी, पाण्याच्या टाक्या तसेच इतर दुरुस्तीसाठी मिळालेल्या १० कोटी २० लाख रुपयांच्या खर्चात ७७ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची गळती झाल्याचे पुढे येत आहे. ...
अकोला: शहराच्या विविध भागातील ले-आउटमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असणाऱ्या ‘ओपन स्पेस’(खुल्या जागा)च्या मुद्यावरून भाजपमध्ये महाभारत रंगल्याची चर्चा आहे. ...
अकोला: महापौर विजय अग्रवाल व भाजप नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे महापालिकेच्या आवारात मंगळवारी पाहावयास मिळाले. ...
खासदार संजय धोत्रे यांचे प्रयत्न व आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ५० कोटी रुपये प्राप्त होऊन उड्डाण पुलाच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
अकोला: विदर्भातील लोकसभेच्या १० मतदारसंघांमध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसेना रणशिंग फुंकणार असून, सभेच्या नियोजनासाठी बुधवारी नागपूर येथे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. ...
अकोला : बंदी असल्यानंतरही अकोल्यात चीनी व नॉयलान मांजाची धडाक्याची विक्री सुरु असून, या मांजामुळे कापल्याने दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी घडली. ...
आकोट/ पोपटखेड: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावातील ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटकडे आगेकूच केली आहे. उपवनसंरक्षक कार्यालयात निवेदन देऊन गावकऱ्यांनी पोपटखेड गेट पार करून जंगलात प्रवेश केला आहे. ...