बालकांना पाेलिओ डाेस पाजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST2021-02-05T06:20:51+5:302021-02-05T06:20:51+5:30
रविवारी पाेलिओ निर्मूलन माेहीम अकाेला: येत्या ३१ जानेवारी राेजी शहरात पाेलिओ निर्मूलन माेहीम राबविल्या जाणार असून त्यासाठी मनपाची वैद्यकीय ...

बालकांना पाेलिओ डाेस पाजा
रविवारी पाेलिओ निर्मूलन माेहीम
अकाेला: येत्या ३१ जानेवारी राेजी शहरात पाेलिओ निर्मूलन माेहीम राबविल्या जाणार असून त्यासाठी मनपाची वैद्यकीय आराेग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. शहरातील ५९ हजार २९८ मुलांना पोलिओ डोस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी एकूण ३१४ बुथ तयार केले असून ६६ अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
नळजोडणी वैध करा !
अकोला: शहराच्या विविध भागांत अवैधरित्या नळजोडणी घेतली जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असल्याने नागरिकांनी नळजोडणी वैध करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी केले. अन्यथा कठोर कारवाईचा इशारा हुंगे यांनी दिला आहे. नळजाेडणीच्या माध्यमातून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ऑटोमुळे वाहतूक विस्कळीत
अकोला: गांधी रोडवर ऑटोचालकांच्या मनमानीमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. थांबा नसताना मनमानीरित्या भर चौकात ऑटो उभे केले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांसमोर असे प्रकार हाेत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
फतेहअली चौकात वाहतुकीची कोंडी
अकोला:शहराच्या मध्यवर्ती भागातील वर्दळीचा भाग असलेल्या फतेह अली चाैकात शुक्रवारी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्यालगत ऑटोचालकांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली हाेती. स्थानिक दुकानदार, व्यावसायिकांनी पुढाकार घेत वाहतुकीची काेंडी साेडविली.
गांधी चौकात अस्वच्छता
अकोला: शहराची प्रमुख बाजारपेठ अशी ओळख असलेल्या गांधी रोडवर साफसफाईअभावी प्रचंड कचरा साचल्याचे शुक्रवारी दिसून आले. गांधी चौकात मातीचे ढीग, साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांची लगबग
अकाेला: शासनाच्या निर्देशानुसार २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू हाेताच विद्यार्थ्यांची शालेय साहित्य खरेदीसाठी लगबग सुुरू झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी गांधी चाैकातील दुकानांत विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी दिसून आली. यावेळी साेशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे चित्र हाेते.