शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

व्यापाऱ्यांच्या काेराेना चाचणीचा वेग मंदावला; बाधितांचा आकडा वाढला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 10:29 IST

CoronaVirus : व्यापाऱ्यांनी चाचणीसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र असले तरी चाचणीचा वेग मंदावल्याचे समाेर आले आहे.

अकोला : शहरात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनपा प्रशासनाने अकाेलेकरांना काेराेना चाचणीचे आवाहन केले. चाचणीचा अहवाल नसेल तर दुकानांना सील लावले जाईल, या धास्तीपाेटी व्यापाऱ्यांनी चाचणीसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र असले तरी चाचणीचा वेग मंदावल्याचे समाेर आले आहे. दुसरीकडे काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला असून, मंगळवारी प्राप्त अहवालानुसार शहरातील २७० जणांना काेराेनाची लागण झाली आहे. शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. लाॅकडाऊनमुळे उद्याेग व व्यवसाय संकटात सापडल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने खुली करण्याची परवानगी मागितली. यासाठी व्यापारी व कामगारांना काेराेना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. अन्यथा दुकानांना सील लावण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली. कारवाईच्या धास्तीपाेटी का हाेईना व्यापारी, कामगार व काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी चाचणीसाठी एकच गर्दी केली. मनपाचे नागरी आराेग्य केंद्र तसेच विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स, विविध व्यापारी संघटना व नगरसेवकांच्या मदतीने सुरू केलेल्या चाचणी केंद्रांवर मंगळवारी एकूण १ हजार ४६३ नागरिकांच्या स्वॅबचे नमुने घेण्‍यात आले. एकूणच चित्र लक्षात घेता काेराेना चाचणीचा वेग काहीसा मंदावल्याचे समाेर आले आहे.

 

१ हजार ४२८ जणांना दिलासा

मनपाचे रुग्णालय व शहरात विविध ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या चाचणी केंद्रांवर ४८० नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच ९८३ नागरिकांनी रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणी केली. चाचणीअंती ३५ नागरिकांचे अहवाल पाॅझिटिव्ह प्राप्त झाले असून, १ हजार ४२८ नागरिकांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत.

 

या ठिकाणी चाचणीसाठी गर्दी

कस्‍तुरबा गांधी रुग्‍णालय, चौधरी विद्यालय, रतनलाल प्‍लॉट, जीएमडी मार्केट रामनगर, मनपा शाळा क्र. १६, आदर्श काॅलनी, हरिहरपेठ, नायगांव, किसनीबाई भरतीया रुग्‍णालय, मनपा आयुर्वेदिक दवाखाना अशोक नगर, माेठी उमरी येथील विठ्ठल मंदिर, सातव चौक या ठिकाणी चाचणीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

२७० जणांवर उपचार

मागील काही दिवसांपासून शहरात काेरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अकाेलेकरांनी सोशल डिस्‍टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. मंगळवारी शहराच्या विविध भागांतील २७० जण काेराेना पाॅझिटिव्ह निघाले असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला