गोरक्षण रोडवरून ४.५0 लाखांचा मुद्देमाल पळविला

By Admin | Updated: March 27, 2017 02:49 IST2017-03-27T02:49:16+5:302017-03-27T02:49:16+5:30

पोलीस भरती तसेच लॉन्सच्या उद्घाटनात व्यस्त.

Over 4.50 lakhs escaped from Gorakhya road | गोरक्षण रोडवरून ४.५0 लाखांचा मुद्देमाल पळविला

गोरक्षण रोडवरून ४.५0 लाखांचा मुद्देमाल पळविला

अकोला, दि. २६- गोरक्षण रोडवरील अशोक वाटिकेत दोन विविध ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून अंदाजे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी भरदिवसा घडली. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोलीस भरती तसेच लॉन्सच्या उद्घाटनात व्यस्त असतानाच चोरट्यांनी हा डाव साधल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेतील कर्मचारी सचिन पवार हे गोरक्षण रोडवरील अशोक वाटिका दोनमध्ये राहतात. ते त्यांच्या परिवारासह बाहेरगावी गेले होते. ते दुपारी घरी परत आल्यानंतर त्यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे त्यांना दिसले. घरात पाहणी केली असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाटातील दागिने आणि रोख असे एकूण तीन लाखांचा ऐवज लंपास झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Over 4.50 lakhs escaped from Gorakhya road