शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

१४ हजार विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे ओढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 2:39 PM

अकोला: नुकताच दहावीचा निकाल लागला असून, २४ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ७८0 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत तर ८ हजार ३0४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

ठळक मुद्देअकरावी विज्ञान शाखेच्या केंद्रीय पद्धतीने आॅफलाइन प्रवेश प्रक्रियेला १३ जूनपासून प्रारंभ झाला आहे. यंदा १४ हजार ७४ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण तज्ज्ञांच्या मते हे सर्व विद्यार्थी विज्ञान शाखेकडे कल असणारे आहेत.

अकोला: नुकताच दहावीचा निकाल लागला असून, २४ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ७८0 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत तर ८ हजार ३0४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ही विज्ञान शाखेलाच असल्याचे त्यांच्या टक्केवारीतून दिसून येते. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे.अकरावी विज्ञान शाखेच्या केंद्रीय पद्धतीने आॅफलाइन प्रवेश प्रक्रियेला १३ जूनपासून प्रारंभ झाला आहे. अकोला शहरात विज्ञान शाखा असलेले ५३ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ८ हजार विज्ञान शाखेच्या जागा आहेत. या जागांवर विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा, या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाने गतवर्षीपासून केंद्रीय पद्धतीने आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल सर्वाधिक लागला आहे. यातही मुलींच्या यशाची टक्केवारी ८९ टक्के आहे. यंदा १४ हजार ७४ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण तज्ज्ञांच्या मते हे सर्व विद्यार्थी विज्ञान शाखेकडे कल असणारे आहेत. शहरात सर्वाधिक ११ हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ८ हजार विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेला प्रवेश देण्यात येणार आहे आणि उर्वरित सहा हजार विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विज्ञान शाखा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. उर्वरित १0 हजार विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेसोबतच, तंत्रशिक्षण, एमसीव्हीसी, आयटीआय शाखेकडे वळणार असल्याचे एकंदरीत या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवरून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)दहावी उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थीविशेष प्रावीण्य श्रेणी                    - ५७८0प्रथम श्रेणी                                 - ८२९४द्वितीय श्रेणी                            - ७९४६पास श्रेणी                                 - २0३२..............................................................एकूण                                        - २४0५२

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक