शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

कृषी विद्यापीठाकडून फुलाचे दुसरे संकरित वाण विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:40 AM

येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘गोल्ड ग्लॅडीओलस’ ही संकरित फुलाची जात विकसित केली असून, संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीने या फुलाचे उत्पादन घेण्यासाठीची मान्यता दिली आहे.

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘गोल्ड ग्लॅडीओलस’ ही संकरित फुलाची जात विकसित केली असून, संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीने या फुलाचे उत्पादन घेण्यासाठीची मान्यता दिली आहे.बाजारात आकर्षक फुलांची मागणी प्रचंड वाढल्याने कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुधीर दलाल यांनी सोनेरी रंगाची आकर्षक ग्लॅडीओलस संकरीत फुलाची जात विकसित केली. याआधी रोशनी या नावाने ग्लॅडीओलस फुलाची जात विकसित करण्यात आली होती. ‘रोशनी’चा रंग गुलाबी पांढरा आहे. उत्पादनही हेक्टरी ५ लाख २०० फुलदांडे आहे. गोल्ड ग्लॅडीओलसचे उत्पादन हेक्टरी ४ लाख ८०० फुलदांडे आहे; पण ही जात आकर्षक सोनेरी असल्याने मागणी जास्त असल्याने या जातीवर संशोधन सुरू होते.देशात फुलांची मागणी बघता, कृषी विद्यापीठांनी भरघोस उत्पादन देणाऱ्या संकरीत फुलांच्या जाती विकसित करण्यावर भर दिला असून, यावर संशोधन सुरू आहे. अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने रोशनी, गोल्ड या दोन ग्लॅडीओलस फुलांच्या जाती विकसित केल्या असून, या अगोदर पीडीकेव्ही रागिणी ही शेवंती फुलाची जात विकसित केली. या शेवंती फुलाच्या जातीची मोठी मागणी आहे.ग्लॅडीओलसची मागणी मोठी असल्याने या कृषी विद्यापीठाने या जातींच्या संशोधनावर भर दिला होता. राज्य, विदर्भाच्या वातावरणात येणाºया या जाती आहेत.या फुलांना बाजारात चांगली मागणी आहे. हे विचारात घेऊनच ही संकरीत फुलाची जात विकसित करण्यात आली आहे.- डॉ. व्ही. के. खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला