सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:12 IST2017-09-07T01:12:01+5:302017-09-07T01:12:01+5:30

अकोला : गळा आवळून खून केल्यानंतर घरजावई असलेल्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणार्‍या सात जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला आहे. 

Order for murder against seven people | सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश

सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश

अकोला : गळा आवळून खून केल्यानंतर घरजावई असलेल्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणार्‍या सात जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला आहे. 
सोळाशे प्लॉटमधील सय्यद निजाम सय्यद वाहेद यांचा मुलगा सय्यद वसीम सय्यद निजामचा विवाह जबरदस्तीने फिरोज खान सालार खान, बानोबी सालार खान यांनी त्यांची मुलगी सलमाबी हिच्यासोबत लावल्याचा आरोप मृतकाच्या पित्याने केला आहे. विवाहानंतर काही दिवसांनी सालारखान यामीन खान, बानोबी सालारखान, फिरोज खान सालार खान, अफरोज सालार खान, अमजद खान सालार खान, जुनेद खान सालार खान यांनी सय्यद वसीम सय्यद निजाम याला मारहाण करून त्याचा गळा आवळला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या पित्याने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले होते. पोलिसांनी यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांकडून केलेल्या पंचनाम्याबाबत शंका निर्माण झाल्याने मृतकाच्या पित्याने न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायाधीश डी. एस. दाभाडे यांनी याप्रकरणात सदर सात जणांविरुद्ध खून, कट रचने यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. याचिकाकर्त्यांकडून अँड. अली रजा खान यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Order for murder against seven people