सत्तेत असताना विरोधकांनी तिजो-यांचे सिंचन केले, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 05:06 PM2017-12-17T17:06:21+5:302017-12-17T19:42:00+5:30

सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, याप्रकल्पांचे कामही सुरू झाले परंतू मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजो-यांच्या सिंचन केले असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Opponents irrigated Tijo's while in power; Cold on opponents of Chief Minister | सत्तेत असताना विरोधकांनी तिजो-यांचे सिंचन केले, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

सत्तेत असताना विरोधकांनी तिजो-यांचे सिंचन केले, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

Next

अकोला -

विदभार्तील शेतकरी आत्महत्यांचे मुळे हे सिंचनाच्या कमतरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, याप्रकल्पांचे कामही सुरू झाले परंतू मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजो-यांचे सिंचन केले असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही -गडकरी

सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून हरित क्रांती होईल. शेतकºयाच्या बांधापर्यंत पाणी दिल्या जाईल त्यामुळे हे प्रकल्प वेळत पूर्ण करा, निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. येणाºया काळात सिचंन प्रकल्पातून कालव्याद्वारे नव्हे तर जलवाहिनी द्वारे पाणी दिले जाईल त्यामुळे पाण्याचा वापर तिपटीने वाढेल असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूतल परिवहन तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते गांधीग्राम येथे आयोजित समारंभात बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ रविवारी झाला त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, विदभार्तील सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल २० हजार कोटीची गरज होती. या निधीचा प्रस्ताव आम्ही पंतप्रधानांकडे दिल्यावर नितीनजी गडकरी यांनी एका दिवसात त्याचा पाठपुरावा केला म्हणून हा निधी उपलब्ध होऊ शकला. येणाºया कालावधीत या निधीचा पुर्ण विनियोग करून सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था शेतकºयांना दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंचन प्रकल्प पुर्ण करण्याची इच्छाशक्ती विरोधकांमध्ये नव्हती त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांनी केला. यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, जिल्हापरिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळीराम सिरस्कार, आ.हरिष पिंपळे, आ. रणधीर सावकर, महापौर विजय अग्रवाल, आदी उपस्थित होते. 

कर्जमाफीमध्ये विदर्भाला ७ हजार ५०० कोटी 

काँग्रेसने सन २००८मध्ये दिलेली कर्जमाफी ही केवळ ६ हजार कोटीची होती व त्यामध्ये विदभार्ला फक्त १५०० कोटी मिळाले मात्र भाजपा सरकारने दिलेल्या कर्जमाफीमध्ये विदभार्तील शेतकºयांना तब्ब ल ७ हजार ५०० कोटी दिले आहेत. शेवटच्या शेतकºयांचे कर्ज माफ होईपर्यंत ही योजना सुरू राहिल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. सभेपुर्वी शेतकरी जागर मंच, शेतकरी संघटना तसेच शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी स्थानबद्ध करण्यात आले होते. सभा संपल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.  

शिवसेना कार्यकर्ते उधळनार होते मुख्यमंत्र्यांची सभा
गांधीग्राम येथे.मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी  साहेब यांचा कार्यक्रम दरम्यान बोन्ड अळी सोयाबीन ,मुंग, उडीद ,कापूस या पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालेल्या असताना सरकार उद्घाटन करून फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत याचा निषेध करण्याकरिता शिवसेनेचा वतीने आजची सभा उधडण्यासाठी आंदोलन करण्यात येत असताना गांधीग्राम येथे शिवसेनेचे कार्यकर्ते मुकेश निचळ, रोषण पर्वतकर, बजरंग गोतमरे, कार्तिक गावंडे ,संतोष जगताप, शंकर यादव नितीन गोलम यांना सभे दरम्यान घोषणा देताना , सोयाबीन फेकताना, बोन्ड अंडी दाखवून निषेध करतांना अटक करण्यात आली

Web Title: Opponents irrigated Tijo's while in power; Cold on opponents of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.