शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

भरवस्तीत खुलेआम चालतात जुगार अड्डे!

By admin | Updated: February 4, 2015 01:48 IST

रस्त्यावरच भरते जुगारींची यात्रा; पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष.

अकोला : कायद्याचे राज्य आहे किंवा नाही, अशी परिस्थिती दाखविणारे चित्र मंगळवारी अकोला शहरातील काही भागात आढळून आले. खुलेआम भररस्त्यावर जुगार अड्डे सुरू असून येथे जुगारींची यात्राच भरत असल्याचे चित्र ह्यलोकमतह्ण चमूने जठारपेठ, उमरी नाका, शिवणी, कृषी विद्यापीठ परिसर, सिंधी कॅम्प परिसरात केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णदरम्यान बघावयास मिळाले.कृषी विद्यापीठ परिसरात झाडाझुडुपांच्या आश्रयाने जुगाराचे डाव रंगतात. एवढेच नाही तर शिवणी, शिवरमध्ये जुगाराचे चांगलेच पीक आले आहे. गल्लीबोळांमध्ये खुलेआम १0 ते १५ जणांचा घोळका करून जुगारी आकडेमोड करण्यात मग्न असल्याचे दिसून आले. प्रत्येक सदस्याच्या हातात आकडे लिहिलेल्या चिठ्ठय़ा, पेन व पैसे दिसून येत होते. ह्यलोकमतह्ण चमूने सिंधी कॅम्प परिसरातील कच्छी खोली, महात्मा फुलेनगर, जिरा बावडी खदान परिसरामध्ये दुपारी ४ वाजताच्या सुमारास फेरफटका मारला असता, सात ते आठ युवक घोळका करून बसल्याचे दिसून आले. या ठिकाणी गोटींच्या नंबरवर खेळ रंगला होता. घोळक्यातील प्रत्येकाला एक नंबर दिला होता. गोटीचा नंबर उघडल्यास संबंधित सदस्याला इतर सदस्य ठरलेली रक्कम देत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ह्यलोकमतह्ण चमूने त्यांचा मोर्चा जठारपेठेतील उमरी नाक्याकडे वळविला. तेथे पोलीस चौकीच्या बाजूलाच खुलेआम जुगार सुरू असल्याचे दिसून आले. थोडे पुढे गेल्यानंतर येथील जुन्या नाकाजवळील कॉर्नरवर काही वृद्ध, तरुण चिठ्ठय़ा व पैसे हातात घेऊन असल्याचे आढळले. उमरी नाक्यावरून स्टेट बँक कॉलनीकडे जाणार्‍या मागावर खुल्या जागेत ८ ते १0 जण चिठ्ठीपट्टीचा जुगार खेळताना आढळले. या याशिवाय जुने शहर, रामदासपेठ आणि आकोटफैल परिसरातही अड्डे सुरू आहेत. पोलीस अधून-मधून जुगार अड्ड्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचा देखावा करतात. सर्व काही ह्यठरल्याप्रमाणेह्ण होत असल्याने पोलीस छाप्यातून किरकोळ रक्कम जप्त करीत प्याद्यांवर कारवाई करण्यात येते; मात्र जुगार अड्डा चालविणारा मुख्य आरोपी मोकळाच राहतो.