शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या : पारदर्शकतेच्या नावाखाली अंमलबजावणीचा गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:45 IST

अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले अधिकार गुंडाळून ठेवत ग्रामविकास खात्याने राज्यात एकाचवेळी शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीची प्रक्रिया राबविली.

ठळक मुद्देपारदर्शकतेच्या चांगल्या हेतूने राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेत अंमलबजावणीच्या स्तरावर प्रचंड त्रुटी राहिल्याने सध्या राज्यभरात शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ सुरू आहे. बदली अधिनियमानुसार दरवर्षी साधारणपणे ३० टक्के बदल्या केल्या जात असत; मात्र यावर्षी हेच प्रमाण तब्बल ७० टक्क्यांपर्यंत गेले असल्यामुळे काही शाळांवर सर्वच शिक्षक नवे असतील. कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी प्रशासनाने काळजीपूर्वक केलीच नसल्याने बदल्या करण्यात आलेल्या ३० टक्के शिक्षकांवर अन्याय झाला आहे.

-  राजेश शेगोकार

अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले अधिकार गुंडाळून ठेवत ग्रामविकास खात्याने राज्यात एकाचवेळी शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीची प्रक्रिया राबविली. पारदर्शकतेच्या चांगल्या हेतूने राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेत अंमलबजावणीच्या स्तरावर प्रचंड त्रुटी राहिल्याने सध्या राज्यभरात शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ सुरू आहे. बदली अधिनियमानुसार दरवर्षी साधारणपणे ३० टक्के बदल्या केल्या जात असत; मात्र यावर्षी हेच प्रमाण तब्बल ७० टक्क्यांपर्यंत गेले असल्यामुळे काही शाळांवर सर्वच शिक्षक नवे असतील तर काही ठिकाणी सर्वच शिक्षक दिव्यांग राहतील, अशी स्थिती असल्याने शैक्षणिक वर्ष गोंधळाचेच राहील, हे स्पष्ट होत आहे.ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या आॅनलाइन बदली प्रक्रियेचा उद्देश चांगला असला, तरी प्रत्यक्षात बदल्यांचे निकष ठरविताना प्रचंड गोंधळ उडाला आहे. बदली प्रक्रिया राबविण्याचे शेड्युल्ड हे केवळ व्हाटस अ‍ॅप याच माध्यमांद्वारे ठरविण्यात आल्याने यासाठी नेमण्यात आलेला समन्वयक हाच बदल्या करणारा प्रमुख झाला. त्यामुळे बदल्यांसदर्भात असलेले शासकीय धोरण व प्रत्यक्षात व्हाटस अ‍ॅपवरील सूचना यामध्येही अनेकदा तफावत झाल्याने सहाजीकच बदल्यांच्या गोंधळात भरच पडली. कनिष्ठांनी वरिष्ठांना खो देणे, विनंती बदली मागूनही पद रिक्त असताना सेवाज्येष्ठतेनुसार शाळा न मिळणे, संवर्ग ४ मध्ये पती-पत्नी ३० किमीपेक्षा जास्त अंतरावर देणे, दोन शिक्षकीवर तीन शिक्षक देणे, मंजूर पदांपेक्षा जादा शिक्षक देणे, ५३ वर्षांवरील शिक्षकांना बदली न मिळणे, पती-पत्नीपैकी एकालाच बदली देणे, अवघड क्षेत्र ठरवताना कोणतेही आक्षेप मागवले नाहीत. त्यामुळे अपात्र शिक्षकांना बदलीचा अधिकारप्राप्त शाळांचा दर्जा मिळाला. कोणत्या ठिकाणी बदली झाली, कोणी नकार दिला, याची यादी जाहीर झाली नाही. पटसंख्येनुसार शिक्षकांचे समायोजन बदलीपूर्वी करणे आवश्यक होते; मात्र तसे घडले नाही. अशा अनेक गोंधळांची मोठी जंत्रीच अनेक जिल्ह्यात आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनी सादर केलेल्या कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी प्रशासनाने काळजीपूर्वक केलीच नसल्याने बदल्या करण्यात आलेल्या ३० टक्के शिक्षकांवर अन्याय झाला आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तटस्थपूर्वी विनंती बदल्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असे, तो टाळण्यासाठी या बदली प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकार काढल्याने येथील पदाधिकाऱ्यांना या प्रक्रियेत कुठलेही स्थान राहिले नाही. दुसरीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बदलीचा मेमो काढण्याचाही अधिकार ठेवला नाही. शिक्षकांची बदली झाली की थेट सीईओंच्या डिजिटल स्वाक्षरीचा आदेशच शिक्षकाला मिळणार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेही अधिकार एकाप्रकारे गोठवले गेले. चौकशी समिती राहील अहवालापुरतीअकोल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये या बदली प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्या आहेत. ही समिती केवळ शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल सादर करण्यापुरतीच राहणार आहे..

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकAkola ZPअकोला जिल्हा परिषद