'Online' public hearing for sand spots auction on Sunday! | वाळूघाटांच्या लिलावासाठी  रविवारी  'ऑनलाइन 'जनसुनावणी !

वाळूघाटांच्या लिलावासाठी  रविवारी  'ऑनलाइन 'जनसुनावणी !

अकोला : जिल्'ातील प्रस्तावित १४ वाळूघाटांच्या लिलावासाठी रविवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात 'ऑनलाइन' पद्धतीने जनसुनावणी घेण्यात येणार आहे. या जनसुनावणीत 'झूम अ‍ॅप ' चा वापर करण्यात येणार आहे.
राज्यातील नवीन वाळू धोरण गत ३ सप्टेंबर २०१९ रोजी निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रस्तावित वाळूघाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी घेणे आवश्यक आहे. दरम्यान , कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू असलेल्या 'लॉकडाऊन' च्या पृष्ठभूमीवर वाळू घाटांच्या लिलावासाठी 'झूम अ‍ॅप'चा वापर करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत ऑनलाइन जनसुनावणी घेऊन , ई-मेल द्वारे नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्'ातील प्रस्तावित १४ वाळू घाटांच्या लिलावासाठी ७ जून रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी यांच्या कक्षात ऑनलाइन  पद्धतीने जनसुनावणी घेण्यात येणार आहे. झूम अ‍ॅप द्वारे घेण्यात येत असलेल्या या जनसुनावणीत जिल्हाधिकारी , जिल्हा खनिकर्म अधिकारी , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आणि जिल्'ातील नागरिक सहभागी होणार आहेत. या जनसुनावणीत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या हरकती व सूचना ई-मेल द्वारे स्वीकारण्यात येणार आहेत.जनसुनावणीची व्यवस्था जिल्हा खनिकर्म विभागामार्फत पूर्ण करण्यात आली आहे.

Web Title: 'Online' public hearing for sand spots auction on Sunday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.