दाताळा येथील प्रकरणात आरोपीला एक वर्ष कारावासाची शिक्षा

By Admin | Updated: May 24, 2017 19:55 IST2017-05-24T19:55:35+5:302017-05-24T19:55:35+5:30

मूर्तिजापूर : तालुक्यातील दाताळा येथे घडलेल्या गुन्ह्याच्या एकाप्रकरणी विद्यमान न्यायालयाने २० मे रोजी निकाल देऊन आरोपीला एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

One year imprisonment for the accused in the case of Datala | दाताळा येथील प्रकरणात आरोपीला एक वर्ष कारावासाची शिक्षा

दाताळा येथील प्रकरणात आरोपीला एक वर्ष कारावासाची शिक्षा

मूर्तिजापूर : तालुक्यातील दाताळा येथे घडलेल्या गुन्ह्याच्या एकाप्रकरणी विद्यमान न्यायालयाने २० मे रोजी निकाल देऊन आरोपीला एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
तालुक्यातील दाताळा येथे २ एप्रिल २०१४ रोजी आरोपी देवकुमार खांडेकर याने फिर्यादी वर्षा उमेश खांडेकर हिच्याशी सेंट्रिंग घरासमोर ठेवल्याच्या कारणावरून वाद घालून कुऱ्हाडीने डोक्यावर मारून जखमी केले होते, तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने पायावर मारहाण केली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला कलम ३२४, ३२३, ५०४ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पो.हे.काँ. राम पांडे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षाने एकंदरीत आठ साक्षीदार तपासले. पुरावे व साक्षीदारांच्या बयाणावरून विद्यमान न्यायाधीश डी. जी. जगताप यांनी आरोपीला कलम ३२४ व ३२३ नुसार दोषी ठरवून एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. एन. एन. वानखडे यांनी काम पाहिले.

Web Title: One year imprisonment for the accused in the case of Datala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.