दोन दुचाकींच्या अपघातात एक गंभीर जखमी
By सचिन राऊत | Updated: December 24, 2023 18:49 IST2023-12-24T18:46:21+5:302023-12-24T18:49:23+5:30
कुंभारी ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत येत असलेल्या एका मार्गावर दोन दुचाकींची अमोरासमोर धडक झाली.

दोन दुचाकींच्या अपघातात एक गंभीर जखमी
अकोला : कुंभारी ते एमआयडीसी मार्गावर दोन दुचाकींच्या अपघातात एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती आहे.
कुंभारी ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत येत असलेल्या एका मार्गावर दोन दुचाकींची अमोरासमोर धडक झाली. हा अपघात रविवारी पहाटेच्या सुमारास झाल्यानंतर यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. परिसरातील मजुरांनी या जखमीना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन्ही दुचाकी परिसरातच असलेल्या एका औद्योगिक प्रतिष्ठानमध्ये ठेवण्यात आले आहेत. या अपघातातील जखमीचे नाव इंगळे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.