लुटमारप्रकरणी एकजण ताब्यात

By Admin | Updated: October 3, 2015 02:37 IST2015-10-03T02:37:13+5:302015-10-03T02:37:13+5:30

बारा लाख रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी खदान पोलिसांनी एक संशयित ताब्यात घेतला.

One in possession of the robbery | लुटमारप्रकरणी एकजण ताब्यात

लुटमारप्रकरणी एकजण ताब्यात

अकोला: धर्मेश व सुनील गुरूबानी यांना मारहाण करून त्यांच्याकडील बारा लाख रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी गुरुवारी रात्री खदान पोलिसांनी संशयावरून आणखी एका युवकास ताब्यात घेतले. त्याची रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकशी करीत होते. १0 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास धर्मेश व सुनील बलरामदास गुरूबानी हे दोघे भाऊ एकाच मोटारसायकलवर १२ लाख रुपयांची रोकड घेऊन जात होते. दरम्यान, त्यांचा पाठलाग करणार्‍या आठ ते दहा युवकांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्याकडील रोकड हिसकावून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून दहा आरोपींना गजाआड केले. खदान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, लुटमार प्रकरणामध्ये आणखी एका युवकाचा समावेश असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरून शिवसेना वसाहतीत राहणार्‍या एका ३५ वर्षीय युवकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.

Web Title: One in possession of the robbery