शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

एक आमदार, दोन मतदारसंघ; २०१९ मधील निवडणुकांसाठी भाजपाची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 4:07 PM

अकोला: ओसरत्या मोदी लाटेचा धसका घेत भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली असून, पक्षातील प्रत्येक आमदाराकडे विधानसभेच्या आणखी एका मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

- आशिष गावंडेअकोला: ओसरत्या मोदी लाटेचा धसका घेत भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली असून, पक्षातील प्रत्येक आमदाराकडे विधानसभेच्या आणखी एका मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणेच बुथ प्रमुखांकडे ८०० ते १२०० मतदारांची जबाबदारी ठेवण्यात आली आहे. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर होणाऱ्या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत ‘वॉररूम’ स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.२०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपाची बुथ प्रमुखांची रचना यशस्वी ठरली होती. ८०० ते १२०० मतदारांसाठी एक बुथ प्रमुख नेमून २५ कार्यकर्त्यांचे पथक त्यांच्या मदतीसाठी देण्यात आले होते. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्यावतीने अशीच रचना केली जात आहे. बुथ प्रमुखाला त्याच्या मोबाइलवर ‘पीएम’ अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले आहे. मतदारांची भाषा, संस्कृतीची माहिती घेणे, लोकांचा राजकीय कल कुठे आहे, मतदारांमध्ये कोणती राजकीय चर्चा केली जात आहे, याबाबतची माहिती बुथ प्रमुख आणि त्यांचे पथक घेणार आहे. ही माहिती वॉर्ड प्रमुख, मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाच्या वॉररूमला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी मुंबईत ‘वॉर रूम’चे गठन होणार असून, त्यामध्ये मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख नेते यांच्यात चर्चा होऊन त्यानुसार निर्णय घेतले जातील.मुख्यमंत्री, नेत्यांमधील चर्चेसाठी ‘वॉररूम’भाजपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची लाट ओसरल्याची कल्पना येताच, संघटनात्मक बळ आणि अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी पक्ष सरसावल्याची माहिती आहे. मतदारसंघात खासदार आणि आमदारांबद्दल मतदारांचे मत काय आहे, याबाबतचे अहवाल भाजपने तयार केले आहेत. ज्या आमदारांबद्दल जनमत चांगले नाही, त्यांची तिकिटे कापली जाण्याचे संकेत आहेत. कमकुवत उमेदवार असणाºया मतदारसंघात अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याची रणनीती आखण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री व नेत्यांमधील चर्चेसाठी मुंबईत ‘वॉररूम’ स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.

आमदारांचा कस लागणार!भाजपाच्यावतीने पक्षातील प्रत्येक आमदाराकडे एका विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राज्यात भाजपाप्रती असंतोष वाढला असल्याचे निदर्शनास येताच पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आता एका आमदाराकडे दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्याच्या हालचाली सुुरू झाल्या आहेत. यानिमित्ताने संबंधित आमदारांचे राजकीय कसब पणाला लागणार असून, त्यांना ते सिद्ध करावे लागणार असल्याचे बोलल्या जात आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाElectionनिवडणूक