दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:16+5:302021-01-13T04:46:16+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यात अपघाताची मालिकाच सुरू असून, रोज घडणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. १० डिसेंबर रोजी झालेल्या ...

दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, एक गंभीर
मूर्तिजापूर : तालुक्यात अपघाताची मालिकाच सुरू असून, रोज घडणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. १० डिसेंबर रोजी झालेल्या दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे.
रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास बार्शिटाकळी तालुक्यातील परांडा येथील रहिवासी प्रकाश भिमला राठोड (५०) हे मूर्तिजापूर तालुक्यातील गौरखेडी येथून दशक्रियेचा कार्यक्रम आटोपून त्यांच्या गावी दुचाकी क्रमांक एमएच ३० एयू ३१९३ ने परत जात हाेते. दरम्यान, कंझरा टी पॉइंटवर पाठीमागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसरा अपघात १० जानेवारी राेजी दुपारी ४ वाजता कारंजा राेडवर किनखेड फाट्याजवळ घडला. यात राेही आडवा आल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अमरावती जिल्ह्यातील कापूसतळणी येथील रहिवासी श्रीकांत दयाराम ढोके (४०) हे बोरी अरब येथून एमएच २७ एजी ९७७१ या क्रमांकाच्या दुचाकीने गावी परत जात हाेते. दरम्यान, किनखेड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीसमोर अचानक रोही आडवा आल्याने दुचाकीसह रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आपत्कालीन पथक व १०८ घटनास्थळी दाखल झाले. अमोल खंडारे, सेनापती शेवतकार, अक्षय सूर्यवंशी, स्वप्निल चौधरी, भूषण तिहिले यांच्या मदतीने मृतदेह व जखमीला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.