दुचाकी अपघातात एक ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:00 PM2021-06-24T23:00:52+5:302021-06-24T23:02:34+5:30

Accident News: दुचाकी अपघातात एक ठार, दोघे जखमी झाले आहेत.

One killed, two injured in two-wheeler accident | दुचाकी अपघातात एक ठार, दोघे जखमी

दुचाकी अपघातात एक ठार, दोघे जखमी

googlenewsNext


मूर्तिजापूर :  कंझरा रोडवर एमआयडीसी परिसरात पादचारी व्यक्तीस दुचाकीची जोरदार धडक बसल्याने या अपघातात दुचाकीसवरील एक जण घटनास्थळीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला. दुचाकीची पादचाऱ्यास धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना २४ जून रोजी सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान घडली.
       बाळापूर तालुक्यातील खिरपूरी येथील योगेश नागोलकर व त्याचा मित्र विशाल दांदळे हे कामा निमित्त आले होते. ते नेमके कुठल्या गावाला आले होते हे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नाही. ते रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान दुचाकीने गावी परत जात असताना कंझरा रोडवर एमसीडी परिसरात इव्हिनिंग वाक करीत असलेल्या व्यक्तीला दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत योगेश नागोलकर (२४) हा घटनास्थळीच ठार झाला तर त्याचा मित्र विशाल दांदळे हा जखमी झाला. त्याच बरोबर पादचारी हा गंभीररीत्या जखमी झाला. घटनेची माहिती कळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतक व जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  पादचारी व्यक्ति गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.

Web Title: One killed, two injured in two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.