One killed, two injured in an accident near Akot | भरधाव कारने दुचाकीस उडविले; एक ठार, दोन जखमी

भरधाव कारने दुचाकीस उडविले; एक ठार, दोन जखमी

ठळक मुद्दे पती-पत्नीसह मुलगा गंभीररीत्या जखमी झालेत. जखमी झालेल्या पतीचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. कार चालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

अकोट/ पणज : अकोट-अंजनगाव मार्गावर पणजनजीक मद्यधुंद कार चालकाने दुचाकीस उडविले. त्यामध्ये पती-पत्नीसह मुलगा गंभीररीत्या जखमी झालेत. गंभीर जखमी झालेल्या पतीचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार पणज येथील वासुदेव लाजुरकर, लता लाजुरकर व मुलगा अन्वेश हे तिघे मोटारसायकलवर अकोटवरून गावी पणज येथे जात होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने अंजनगाववरून भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. त्यामध्ये लाजुरकर कुटुंबीय गंभीररीत्या जखमी झालेत. त्यांना वाटसरूंनी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले. गंभीर जखमींना अकोला येथे उपचारार्थ रवाना करण्यात आले. दरम्यान, वासुदेव लाजुरकर यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. कार चालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कारमधील इतर जण पळून गेले. कार चालकाने मद्य प्राशन करून कार चालवित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वृत्त लिहिस्तोवर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: One killed, two injured in an accident near Akot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.