तिहेरी अपघातात एक ठार सहा जखमी

By सचिन राऊत | Updated: February 4, 2024 12:09 IST2024-02-04T12:09:38+5:302024-02-04T12:09:53+5:30

तुकाराम चौकाकडून मलकापूर कडे जात असलेल्या भरधाव मालवाहूने समोरून येत असलेल्या दुचाकी व आटोला जबर धडक दिली.

One killed, six injured in triple accident in akola | तिहेरी अपघातात एक ठार सहा जखमी

तिहेरी अपघातात एक ठार सहा जखमी

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर रोडवर मालवाहू वाहनाने ऑटो व दुचाकीस जबर धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात चंद्रकला सोनुने नामक महिलेचा जागेवर मृत्यू झाला असून ऑटोतील सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तुकाराम चौकाकडून मलकापूर कडे जात असलेल्या भरधाव मालवाहूने समोरून येत असलेल्या दुचाकी व आटोला जबर धडक दिली. या अपघातात सोनूने नामक महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर ऑटोलाही धडक दिल्याने सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर पंचनामा करून मालवाहू वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: One killed, six injured in triple accident in akola