हाता: दाेन दुचाकींच्या अमाेरासमाेर झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना १ जानेवारी राेजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हाता राेडवर घडली. संजय रामकृष्ण तायडे, रा. हाता असे मृतकाचे नाव असून, अतुल साहेबराव दामाेदर, रा. हाता हे जखमी झाले आहेत. उरळ पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हाता येथील किराणा व्यावसायिक संजय तायडे हे कारंजा रमजानपूरकडे दुचाकीने जात हाेते, तर हाता येथीलच अतुल दामाेदर हे निंबा फाट्यावरून गावाकडे दुचाकीने येत असताना गावाजवळ दाेघांच्या दुचाकींची अमाेरासमाेर धडक झाली. यामध्ये संजय तायडे हे जागीच ठार झाले तर अतुल दामाेद हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ अकाेला येथे पाठविण्यात आले. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तायडे यांच्या मृत्यूमुळे गावात शाेककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, दाेन मुले असा परिवार आहे.
दुचाकीची अमाेरासमाेर धडक, एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 11:29 IST
Accident News संजय रामकृष्ण तायडे, रा. हाता असे मृतकाचे नाव असून, अतुल साहेबराव दामाेदर, रा. हाता हे जखमी झाले आहेत.
दुचाकीची अमाेरासमाेर धडक, एक जण ठार
ठळक मुद्देकिराणा व्यावसायिक संजय तायडे हे कारंजा रमजानपूरकडे दुचाकीने जात हाेते.अतुल दामाेदर हे दुचाकीने येत असताना गावाजवळ दाेघांच्या दुचाकींची अमाेरासमाेर धडक झाली.