बाळापूरनजीक अपघातात एक ठार, एक जखमी
By Admin | Updated: June 22, 2017 04:38 IST2017-06-22T04:38:24+5:302017-06-22T04:38:24+5:30
बाळापूर येथील शेगाव चौफुलीवर २0 जून रोजी रात्री २.३0 वाजता परस्परविरुद्ध दिशांनी येणार्या दोन ट्रकची धडक झाल्याने एक ट्रकचालक ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला.

बाळापूरनजीक अपघातात एक ठार, एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : येथील शेगाव चौफुलीवर २0 जून रोजी रात्री २.३0 वाजता परस्परविरुद्ध दिशांनी येणार्या दोन ट्रकची धडक झाल्याने एक ट्रकचालक ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला.
खामगावहून येऊन अकोल्याकडे जाणार्या एपी 0७-टीई ८४५६ क्रमांकाच्या ट्रकची अकोल्याकडून खामगावकडे जाणार्या एमएच २0 डब्ल्यू ८२१७ क्रमांकाच्या ट्रकशी येथील शेगाव चौफुलीवर मंगळवारी रात्री २.३0 वाजता समोरासमोर धडक झाली.
या अपघातात गौसखान नावाचा एक ट्रकचालक ठार झाला.
या अपघातात जखमी झालेल्या इसमाचे नाव कळू शकले नाही. याप्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.