शेतात विजेचा शॉक लागून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 20:03 IST2020-10-11T20:03:41+5:302020-10-11T20:03:48+5:30
Electiricity Accident राजीक खा राशीद खा यांचा वीज तारांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शेतात विजेचा शॉक लागून एक ठार
हिवरखेड : हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या तळेगाव शेतशिवारामध्ये गवत आणण्यासाठी गेलेल्या एकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीकखा राशीद खा हे तळेगाव शेतशिवारात गवत आणण्यासाठी गेले होते. वन्य प्राण्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी अशोक लक्ष्मण कराळे यांनी शेतात विजेचा प्रवाह जोडला होता. दरम्यान, राजीक खा राशीद खा यांचा वीज तारांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ काजीमखा रशीदखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अशोक लक्ष्मण कराळे यांच्याविरुद्ध पोलिसांनी कलम ३०४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार आशीष लव्हंगळे, पीएसआय विठ्ठल वाणी, एएसआय गोपाल दातीर करीत आहेत. (प्रतिनिधी)