दरड कोसळल्याने एक ठार

By Admin | Updated: June 22, 2015 02:07 IST2015-06-22T02:07:54+5:302015-06-22T02:07:54+5:30

रेतीचे उत्खनन करीत असताना दरड कोसळून युवकाचा मृत्यू.

One killed due to crackdown | दरड कोसळल्याने एक ठार

दरड कोसळल्याने एक ठार

नांदुरा (जि. बुलडाणा): : रेतीचे उत्खनन करीत असताना दरड कोसळून त्याखीला दबल्याने २0 वर्षी तरुणाचा दबून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ८.३0 वाजता वडनेर भोलजी येथे घडली. शे. मोहसीन शे. कादर (२0 रा. वडनेर भोलजी0 हा इतर सहकार्‍यांसह समाधान जयराम वानखडे यांच्या वडनेर भोलजी परिसरातील शेतात रेतीचे उत्खनन करीत होता. यादरम्यान अचानक रेतीची दरड कोसळली. त्याखाली शे. मोहसीन हा दबला व मरण पावला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ शे. आसिफ शे. रज्जाक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. ठाणेदार साळुंके यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल दराडे व कॉन्स्टेबल काकड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: One killed due to crackdown