चतारी येथे देशी दारू विक्री करताना एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:55+5:302021-06-05T04:14:55+5:30

खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथे एका घरात देशी दारूची विक्री करताना शुक्रवारी सायंकाळी चान्नी पोलिसांनी धाड टाकून एकाला ...

One arrested while selling native liquor at Chatari | चतारी येथे देशी दारू विक्री करताना एकाला अटक

चतारी येथे देशी दारू विक्री करताना एकाला अटक

खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथे एका घरात देशी दारूची विक्री करताना शुक्रवारी सायंकाळी चान्नी पोलिसांनी धाड टाकून एकाला अटक केली.

चतारी येथे अंगणवाडी परिसरातील दिनेश मांजरे हे घरामध्ये देशी दारूची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार घुईकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन, गणेश नावकार, सुधाकर करवते, देशमुख, गवई, विजया चोरपगार यांनी सापळा रचून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दिनेश मांजरे याच्या घरात छापा टाकला असता, दिनेश मांजरेला घरात देशी दारूची विक्री करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्या घरातून सहा हजार रुपये किमतीचे देशी दारूचे शंभर कॉटर जप्त करून दिनेश मांजरे याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याची समजपत्रावर सुटका करण्यात आली आहे. यापूर्वीसुद्धा दिनेश मांजरे याच्या घरी दोन वेळा चान्नी पोलिसांनी छापा टाकला होता; परंतु पोलीस कारवाईविनाच परतले होते. यावेळी सापळा रचून कारवाई करण्यात आली.

Web Title: One arrested while selling native liquor at Chatari