वृद्धेकडील दीड लाखांचे दागिने पळविले !

By Admin | Updated: September 14, 2014 01:35 IST2014-09-14T01:35:14+5:302014-09-14T01:35:14+5:30

अकोल्यातील जठारपेठभागातील घटना.

One and a half lakhs of ornaments worth over Rs. | वृद्धेकडील दीड लाखांचे दागिने पळविले !

वृद्धेकडील दीड लाखांचे दागिने पळविले !

अकोला - न्यू तापडियानगर येथील एक वृद्धा शनिवारी पहाटे जठारपेठमधून जात असतांना त्यांच्याकडील ६0 ग्रॅमचे सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. दोन युवकांनी या वृद्धेला चर्चेत गुंतवून दागिने पळविले. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. खरप रोडवरील न्यू तापडियानगर येथील रहिवासी कमल अजाबराव पोटकटारे (६७) शनिवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान सायकल रिक्षाने जठारपेठकडे जात असताना त्यांना डॉ. भागडे हॉस्पिटलसमोर दोन युवकांनी अडविले. त्यानंतर समोरील चौकामध्ये चोरटे असल्याने जवळील दागिने बॅगमध्ये ठेवण्याचे सांगितले. या महिलेने दोन्ही युवकांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून आपल्या शरीरावरील दागिने काढले व बॅगमध्ये ठेवण्याच्या प्रयत्नात असतानाच या युवकांनी हे दागिने घेऊन पळ काढला. यामध्ये सोन्याच्या बांगड्या व सोनसाखळी अशाप्रकारे एकूण ६0 ग्रॅमचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

Web Title: One and a half lakhs of ornaments worth over Rs.